स्त्री

नका समजू अबला स्त्रीला
आहे ती सबला
या सृष्टीची निर्मिती
एका मुलाची जन्मदात्री

एका लहान जीवाला
या जगात आणावयाचे
त्याला गर्भात वाढवण्याचे
सामर्थ्य  आहे स्त्रीमध्ये
असंख्य कळा सोसण्याचे

सहनशक्तीचे वरदान
परमेश्वराने दिले फक्त स्त्रीला
सहनशक्ती संपल्यावर
धारण करते तीच स्त्री रौद्र रूपाला

सहन करते म्हणून
समजू नका अबला
सर्व जग पुजते
रौद्ररूपी महाकालीला

नका समजू शक्तीहीन स्त्रीला
आहे ती सबला
या सृष्टीची निर्मिती
नका समजू तिला अबला

About the poem

Over the years, women were treated as inferior to men. People think women are weak. But, women are actually strong. She has the strength to give birth to a child. She has the strength to bare the pain while delivering a child. She has tolerance and patience. But her patience is tagged as her weakness. If women are weak, then why do we worship deity like 'Mahakali'..? Don't consider woman as weak. She is the strongest who can create this world.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कुठे हरवून गेले